ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाइल चोरट्यांना सोयीचे ठरतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:14+5:302021-08-18T04:41:14+5:30
बुलडाणा शहरात विविध गर्दीच्या ठिकाणांसह विविध सण-उत्सवाच्या काळात बाजारपेठेत गर्दी होते. त्यामुळे चोरट्यांची चांगलीच चांदी होते. मोबाइल चोरीच्या १०० ...
बुलडाणा शहरात विविध गर्दीच्या ठिकाणांसह विविध सण-उत्सवाच्या काळात बाजारपेठेत गर्दी होते. त्यामुळे चोरट्यांची चांगलीच चांदी होते.
मोबाइल चोरीच्या १०० घटना
बुलडाणा शहरात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरीचे गुन्हे नेहमी घडतात. तथापि, काहींकडून गहाळ होतात. याबाबत संबंधित मोबाइलधारकांच्या पोलीस प्रशासन फक्त तक्रारीच घेत नाही, तर मोबाइल शोधण्यासह ते मूळ मालकास परत देण्यासही तत्पर असल्याचे बुलडाणा सायबर पोलिसांनी सिद्ध केले आहे. सायबर सेल विभागाने चोरीला गेलेल्या व गहाळ झालेल्या १०० मोबाइलचा शोध लाऊन ते मूळ मालकास मागील महिन्यातच परत केले होते.
चोरी नव्हे, गहाळ म्हणा
अनेक वेळा मोबाइल चोरी न होता, तो गहाळ होत असल्याचेही किस्से समोर आले आहेत. मोबाइल चोरी झाला, तर पोलीस चोरीचा गुन्हा दाखल करतात. मात्र, अनेक वेळा दुकानात खरेदी करताना किंवा बाहेर जाताना मोबाइल त्याच ठिकाणी विसरत असल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे मोबाइल चोरी नव्हे, तर गहाळ झाला असे म्हणा, पोलीसही अशाच प्रकारे नोंद करतात.
येथे मोबाइल सांभाळा
शहरातील मुख्य बाजार पेठ, नगरपालिकेसमोरील रस्ता, बस स्थानक परिसर, जांभरून रोड, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मोबाइल चोरीच्या घटना जास्त घडतात. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाइल सांभाळण्याची गरज व्यक्त होत आहे.