चोर आणि पोलिसांमध्ये चकमक, दोन अटकेत

By admin | Published: November 6, 2016 05:37 PM2016-11-06T17:37:01+5:302016-11-06T17:37:01+5:30

भैय्यानगर परिसरात काल रात्री चोरी करून पळणारे चोर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करत दोन चोरांना बेड्या ठोकल्या.

The thieves and the police fired, two detained | चोर आणि पोलिसांमध्ये चकमक, दोन अटकेत

चोर आणि पोलिसांमध्ये चकमक, दोन अटकेत

Next
>ऑनलाइन लोकमत 
जळगाव जामोद (जि.बुलडाणा), दि. 6 - भैय्यानगर परिसरात काल रात्री दीडच्या सुमारास संतोष म्हसाळ आणि मनोज सातव यांच्या घरात घुसून चोरट्यांनी २० हजाराचा माल लंपास केला. यावेळी संतोष म्हसाळ यास काठीने मारहाण करुन जखमी केले. नाकाबंदीनंतर पळून जाणाºया चोरट्यांनी करणवाडी नाक्यावर पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी हवेत गोळीबार केला असता चोरटे पसार झाले तर त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
५ नोव्हेंबरचे रात्री नांदुरा रोड लगतच्या भैय्यानगरात चोरट्यांनी शेजाºयांच्या घरांच्या कड्या लावून घेतल्या व म्हसाळ तथा सातव यांच्या घरात घुसले. महिलेच्या गळ्यातील पोत तोडली तेव्हा आरडाओरड केली. दरम्यान, संतोष म्हसाळ हे मागील दरवाज्यातून घराबाहेर पडले.  चोर-चोर असे ओरडत असताना पळ काढणाºया चोरट्यांनी त्यांचे हातावर व डोक्यावर काठीने मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर तेथून चोरटे पसार झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सुटीवर असलेले पोस्टेचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी तात्काळ नाकेबंदीच्या सूचना केल्या. तर प्रभारी ठाणेदार जाधव यांनी लगेच बंदोबस्त तगडा केला.  स्थानिक पोलिस पाटील तथा पोलिस उपनिरीक्षक संदीप मुपडे व त्यांचे सहकारी यांनी चोरट्यांची चारचाकी गाडी अडविली. हा प्रकार पाहून गाडीमधून उतरताच सदर चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. तर त्याला प्रतीउत्तर म्हणून पीएसआय मुपडे यांनी हवेत फेरी झाडल्या. त्यामुळे पलायन करणाºया चोरट्यांचा पाठलाग करीत त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर व आणखी एक अशा दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. गाडी जप्त करुन पोलिसांनी संजय पांडुरंग सानप, नारायण किसन आंधळे  दोन्ही रा. अंढेरा या दोघांना अटक केली. भादंविच्या कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. 
दरम्यान, गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारे चाकू, टॉमी, रॉड, पेन्चीस, काठी, लोखंड कापण्याची करवत आदी साहित्य हस्तगत केले आहे. दरम्यान, ७-९ आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून, नांदुरा, तामगाव, सोनाळा, खामगाव ग्रामीण, जलंब, मलकापूर या पोलिस स्टेशन हद्दीतील १० पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 
गुन्हा उघडकीस आणण्यात कर्तव्यदक्षता दाखविल्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी जळगाव जामोद येथील अधिकारी, कर्मचारी आणि नाकाबंदीसाठी असलेल्या सर्व कर्मचाºयांचे अभिनंदन केले आहे. सोबतच पोलिस उपनिरिक्षक संदीप मुपडे यांना ५००० रुपये, पोहेकॉ शत्रुघ्न बर्डे यांना २००० रुपये, तर पो.ना. प्रमोद मुळे व पो.कॉ गणेश पाटील यांना प्रत्येकी १५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 

Web Title: The thieves and the police fired, two detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.