मलकापुरात एकाच दिवशी चोरट्यांनी चार दुकाने फोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 06:31 PM2020-04-22T18:31:49+5:302020-04-22T18:32:07+5:30

गस्तीवरील पोलिसांनी एका चोरट्यांस रंगेहाथ पकडले.

Thieves break four shops in Malkapur on the same day! | मलकापुरात एकाच दिवशी चोरट्यांनी चार दुकाने फोडली!

मलकापुरात एकाच दिवशी चोरट्यांनी चार दुकाने फोडली!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मलकापुर : आठवडी बाजारात नगरपालिका कॉम्पलेक्स मधील चार दुकाने चोरट्यांनी फोडली. हजारोंचा माल लंपास करताना गस्तीवरील पोलिसांनी एका चोरट्यांस रंगेहाथ पकडले. टॉमी कोयत्यासह घातक शस्त्र टाकून बाकी चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. 
सध्या कोरोना या आजाराने सर्वत्र देशात हाहाकार माजवला असुन संपुर्ण देश हा लॉकडाऊन करण्यात आला असतांना मलकापूरात चोरट्यांनी हायरिस्क झोन मधील चार दुकाने फोडल्याची घटना पहाटे तिन वाजेदरम्मान घडली तर या दुकानातुन हजारो रूपयांचा माल चोरीला गेला आहे. येथील आठवडी बाजार परिसरात असलेल्या नगरपरिषद कॉम्पेक्स मधील भाग्यलक्ष्मी प्रोव्हीजन, श्री एजन्सीज, जावेद चिकन सेंटर, आजम खान अ‍ॅड ब्रदर्स ही चारही दुकाने चोरट्यांनी फोडली असुन या चारही दुकानातुन सुमारे सात लाखाहून अधिक रुपयांचा माल चोरीला गेला. चोरट्यांनी दुकानातुन चोरलेला माल घेऊन जात असतांना गस्तीवरील पोलिसांनी एका चोरट्यास रंगेहाथ पकडले. चोरट्यांनी  काहीसा माल चारखंबा चौक परिसरात व नळगंगा नदिवरील पुलावर टाकून पोबारा केला. तर बराच माल हा चोरटे चोरून नेण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Thieves break four shops in Malkapur on the same day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.