खामगावात चोरी, दीड लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:01 AM2019-02-18T10:01:11+5:302019-02-18T10:15:13+5:30
खामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 2.30 वाजता धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला.
खामगाव - खामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 2.30 वाजता धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला.
शहरातील अंजूमन हायस्कूल जवळ राहणारे गोविंद रमेश अग्रवाल (45) हे घरात कुटुंबीयांसोबत झोपले होते. चोरट्यांनी घरात आत प्रवेश केला. गोविंद अग्रवाल, त्यांची पत्नी व त्यांचे वडील ज्या खोलीत झोपले होते. त्याला बाहेरून कडी लावून बंद केले. दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाट फोडून आतील नगदी, सोने चांदीचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलंब नाक्यावर पोलीस चौकी आहे. मात्र त्याठिकाणी पोलीस हजर राहत नाही. दिवसा मात्र पोलीस नित्याने हजर असतात. अवैध प्रवाशी वाहतूकीकडे जेवढे लक्ष पोलिसांचे असते तेवढे लक्ष पोलिसांनी रात्रीच्या गस्तीकडे द्यावी अशी अपेक्षा खामगावकर व्यक्त करीत आहेत.