चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच पळवली, संग्रामपूर शहराती घटना; परीसरात खळबळ
By विवेक चांदुरकर | Published: January 7, 2024 01:35 PM2024-01-07T13:35:13+5:302024-01-07T13:37:17+5:30
पळवून नेलेल्या एटीएम मशिन मध्ये सतरा ते साडे सतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अझहर अली -
संग्रामपूर शहरात एक चोरीची धक्कादायक घटना 7 जानेवारी रोजी सकाळी समोर आली. शहरातील दाटवस्तीतून दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनवर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पळवून नेलेल्या एटीएम मशिन मध्ये सतरा ते साडे सतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सद्या तामगाव पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान शनिवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले. एटीएम मशीनला त्या चार चाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले व मशीन वाहनात भरून पळ काढला. पळवून नेलेल्या एटीएम मशीन मध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेत विना नंबर चार चाकी वाहनाचा वापर करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान तामगाव पोलीसांसमोर उभे ठाकले आहे. तामगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच यामूळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी सकाळी नागरिकांनी गर्दी केली.