खेडकर खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:14+5:302021-06-11T04:24:14+5:30
रंगनाथ खेडकर यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या व पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत पेनटाकळी प्रकल्पात आढळून आला होता. ३ जून रोजीच्या ...
रंगनाथ खेडकर यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या व पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत पेनटाकळी प्रकल्पात आढळून आला होता. ३ जून रोजीच्या या घटनेप्रकरणी अमडापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपास चक्र फिरवत या प्रकरणात सिंदखेड राजा तालुक्यातीलच जागदरी येथील आरोपी भरत प्रल्हाद जायभाये, अंकुश शिवाजी डोईफोडे यांना अटक करण्यात आली होती. मात्र यातील तिसरा आरोपी सचिन गजानन काळुसे (वय २३, रा. जागदरी) हा मात्र फरार झाला होता. दरम्यान, अमडापूरचे ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह शोधमोहीम राबवून ९ जूनरोजी रात्री उशिरा एका चारचाकी वाहनासह मनमाड येथून सचिन गजानन काळुसे यास अटक केली आहे. त्यामुळे रंगनाथ खेडकर याच्या खून प्रकरणातील आणखी काही रहस्य बाहेर येण्याची शक्यता आहे. अनैतिक संबंधातून रंगनाथ खेडकर याचा खून झाल्याचे प्रारंभी पोलिसांनी सांगितले होते. रहस्यपटाला शोभेल अशा पद्धतीने आरोपींनी खेडकर याचा खून केला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.