तिसऱ्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा

By admin | Published: November 10, 2016 12:10 AM2016-11-10T00:10:31+5:302016-11-10T00:12:39+5:30

आश्रम शाळेमधील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अत्याचार प्रकरणात आणखी एक तक्रार करण्यात आली

The third complaint of molestation | तिसऱ्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा

तिसऱ्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा

Next

ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 9 - तालुक्यातील पाळा आदिवासी निवासी आश्रमशाळेमधील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अत्याचार प्रकरणात आणखी एक तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये मंगळवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेच्या दोन विद्यार्थीनींच्या तक्रारीवरुन तब्बल १७ आरोपींविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५ आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. ११ आरोपी पोलीस कोठडीत तर ४ आरोपींना १० नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी एका विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन इत्तुसिंग पवारसह संस्थाध्यक्ष गजानन कोकरे, सचिव संजय कोकरे, सहसचिव पुरुषोत्तम कोकरे, मुख्याध्यापक भरत लाहुडकार, माध्यमिकचे मुख्याध्यापक डिगांबर खरात, तसेच स्वप्नील लाखे, नारायण अंभोरे, दिपक कोकरे, विजय कोकरे, ललित वजीरे, मंठाबाई कोकरे, शेवंताबाई राऊत यांच्या विरुध्द कलम ३७६ (२) (एफ.) (आय) (एन) १०९ भादंवि बाललैंगिक अत्याचार अधिनियम ६, १७,२१, कलम ७५, बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम ३ (२) (५) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दोन दिवसांनी दुसऱ्या पिडीत विद्यार्थिनींच्या पालकाच्या तक्रारीवरुन सदर आरोपींसह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री एका तक्रारीवरुन सर्व आरोपीविरुद्ध कलम ३५४ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The third complaint of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.