तिसऱ्या लाटेची घंटा वाजली, कौशल्य अवगत मनुष्यबळाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:17+5:302021-07-18T04:25:17+5:30

-- ५,२२५ बेड्सची सज्जता-- जिल्ह्यातील कोविड समर्पित रुग्णालय, कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर मिळून ५२५ बेड्सची सज्जता करण्यात आली ...

The third wave bell rang, skill-conscious manpower training | तिसऱ्या लाटेची घंटा वाजली, कौशल्य अवगत मनुष्यबळाचे प्रशिक्षण

तिसऱ्या लाटेची घंटा वाजली, कौशल्य अवगत मनुष्यबळाचे प्रशिक्षण

Next

-- ५,२२५ बेड्सची सज्जता--

जिल्ह्यातील कोविड समर्पित रुग्णालय, कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर मिळून ५२५ बेड्सची सज्जता करण्यात आली आहे. यात ४९४ आसीयू ओटू बेड, १,३४५ ओटू सपोर्टेड बेड, ११४ आयसीयू व्हेंटिलेटर बेड आणि ओटू व्यतिरिक्त ३,२६५ बेडची वेळेत उपलब्धता करण्याची क्षमता आरोग्य विभागाने निर्माण केली आहे.

--लहान मुलांसाठी केअर सेंटर--

लहान मुलांसाठी खामगाव, बुलडाणा आणि शेगाव येथे प्रत्येकी ५० बेडच्या क्षमतेचे केअर सेंटर उपलब्ध करण्यात येत आहे. हे सर्व बेड ऑक्सिजनयुक्त राहणार आहे. यासोबतच ग्रामीण रुग्णालयामध्येही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येत आहे.

--१६ ऑक्सिनज प्लांट तयार--

प्रसंगी ऑक्सिजनची मागणी २५ मेट्रिक टनापर्यंत गेल्यास १,८५२ जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी एक बॅकअप प्लानही आरोग्य विभागाकडे तयार आहे. खामगाव व बुलडाणा येथे सिलिंडर रिफिलिंग करण्यासाठीचेही नियोजन करण्यात आलेले आहे.

----

संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सज्जता ठेवली आहे. ऑक्सिजनसाठीही आणखी ६ केएल व दहा केएलचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रामध्येही ऑक्सिजन उपलब्धतेसाठी ऑक्सिजन पाइपलाइनही टाकण्यात येत आहे.

(डॉ.नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्क, बुलडाणा)

Web Title: The third wave bell rang, skill-conscious manpower training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.