ठिकठिकाणी तलाठी, मंडळ अधिका-यांचे धरणे!
By admin | Published: November 8, 2016 02:15 AM2016-11-08T02:15:25+5:302016-11-08T02:15:25+5:30
घाटाखालील सर्वच तालुक्यात विदर्भ पटवारी संघाच्यावतीने धरणे देण्यात आले.
खामगाव, दि. ७- तलाठी आणि मंडळ अधिकार्यांच्या विविध रास्त मागण्या शासनदरबारी पोहोचविण्यासाठी घाटाखालील सर्वच तालुक्यात विदर्भ पटवारी संघाच्यावतीने धरणे देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तलाठी व महसूल मंळांची पुनर्रचना व मंडळ अधिकारी कार्यालय भाडे देणे, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज या कामातून तलाठी संवर्गास वगळणे यासह इतर मागण्यांकरिता खामगाव-शेगाव तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तसेच मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकून आंदोलनात सहभागी आहेत. धरणे आंदोलनात तलाठी पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे तालुकाध्यक्ष व्ही.बी. उबरहंडे, एच.व्ही. गायगोळ, एस.एस. बाठे, एस.यू. राठोड, एस.आर. गिरे, आर.ए. चौधरी, एस.जी. सातपुते यांच्यासह इतर तलाठी पटवारी उपस्थित होते.