कोरोनाचे ३० टक्के मृत्यू दुर्धर आजारामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:53+5:302020-12-27T04:25:53+5:30

जिल्हास्तरीय कोरोना डेथ ऑडिट समितीने यासंदर्भात निष्कर्ष काढला आहे. दरम्यान, या व्यतिरिक्त ज्या बाधित व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत ते ...

Thirty percent of corona deaths are due to chronic illness | कोरोनाचे ३० टक्के मृत्यू दुर्धर आजारामुळे

कोरोनाचे ३० टक्के मृत्यू दुर्धर आजारामुळे

Next

जिल्हास्तरीय कोरोना डेथ ऑडिट समितीने यासंदर्भात निष्कर्ष काढला आहे. दरम्यान, या व्यतिरिक्त ज्या बाधित व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत ते मोठ्या प्रमाणावरील निमोनिया झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले; मात्र त्यासंदर्भातील अंतिम अहवाल अद्याप तयार करण्यात आला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुर्धर आजारामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग, किडनीच्या आजारांचा समावेश आहे. २६ डिसेंबर रोजी डेथ ऑडिट समितीची बैठक झाली असून, त्यात अनुषंगिक अहवाल अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रामुख्याने या दुर्धर आजारांसोबतच ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे अशा कोरोना बाधितांपैकीही काही जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूदर १.२० टक्के

जिल्ह्याचा मृत्यूदर हा सध्या १.२० टक्क्यांवर स्थिर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९६.२५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर एकूण बाधित रुग्णांची संख्या पाहता सक्रिय रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात अवघे २.५४ टक्क्यांवर आले आहे. परिणामी, पॉझिटिव्हीटी रेटही कमी आहे.

कोट

जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ४५ मृत्यू हे दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींचे झाले आहेत. डेथ ऑडिट समिती नियमित स्वरूपात आठवड्याला आणि १५ दिवसांआड याचा सविस्तर आढावा घेत असून, अनुषंगिक उपाययोजना करत असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

वृद्धांची काळजी आवश्यक

६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांची कुटुंबीयांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अकारण बाहेर न पडता, मास्क वापरणे, नियमित हात स्वच्छ धुणे व वेळेत अैाषधोपचार करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

Web Title: Thirty percent of corona deaths are due to chronic illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.