बुलडाणा जिल्ह्याच्या सीमांवर कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:44 PM2020-05-10T17:44:47+5:302020-05-10T17:45:08+5:30

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे.

Thorough inspection of Buldana district boundaries | बुलडाणा जिल्ह्याच्या सीमांवर कसून तपासणी

बुलडाणा जिल्ह्याच्या सीमांवर कसून तपासणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील तीन रूग्णांना रविवारी सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. आगामी काळात जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने पोलिस प्रशासन सतर्क झाले असून बुलडाणा जिल्ह्याच्या प्रत्येक सिमेवर सक्तीची कसून तपासणी केली जात आहे.
बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्तीची वाटचाल करीत असला तरी, शेजारच्या अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणू संक्रमनाने हाहाकार माजविला आहे. रविवारपर्यंत १३ जणांचा अकोला जिल्ह्यात मृत्यू झाला असून या जिल्ह्यात १५३ च्या वर रूग्ण पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आगामी काळात कोणतीही ‘रिस्क’घेण्यास जिल्हा प्रशासनाची तयारी नाही. परिणामी, जिल्ह्याच्या सिमांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.  पोलिस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्याच्या प्रत्येक सिमेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांची कसून चौकशी केली जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २४ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले होते. यापैकी एका रूग्णाचा मृत्यू झाला होता. उर्वरीत २३ रूग्ण उपचाराने बरे झालेत. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन आणि जिल्ह्यातील विविध नगर पालिका, नगर पंचायतींनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. परिणामी, गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह एकही रूग्ण आढळून आला नाही.

 

 
अकोला जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात येणाºया शेगाव तालुक्याच्या सर्वच सीमा सिल केल्या आहेत. रविवारी नागझरी येथे कसून तपासणी करण्यात आली.ही मोहीम यापुढेही सुरूच राहील.
- संतोष ताले
निरिक्षक, शेगाव शहर

 

Web Title: Thorough inspection of Buldana district boundaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.