‘त्या’ आरोपींना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: October 17, 2016 02:29 AM2016-10-17T02:29:02+5:302016-10-17T02:29:02+5:30
मलकापूर पांग्रा येथील इरफान खान अमजतखान खून प्रकरणी पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी.
सिंदखेडराजा, दि. १६- संपूर्ण जिल्हय़ात मलकापूर पांग्रा येथील इरफान खान अमजतखान खून प्रकरणात मुख्य आरोपीसह पाच व्यक्तींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तब्बल १0 दिवस पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
मलकापूर पांग्रा येथील बैल बाजारात दलालाची कामे करणारा इरफान खान पठाण (वय ५0 वर्षे) यांची १२ सप्टेंबरला रात्री अमानुष हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी माजी सरपंच नदीम हुसेन जाकीर हुसेन सिद्दिकी (३0), जावेदखा उमरखा (३१), फिरोजखा रज्जाकखा पठाण (३३), फिरोजखा दौलतखा पठाण (३0), शेख मन्नान शेख महेबुब कुरेशी (३४) सर्व रा. मलकापूर पांग्रा यांना ६ ऑक्टोबरला अटक केली होती. १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपींना घटनास्थळ आणि शस्त्र दाखवून त्यांच्याकडून ती सर्व जप्त केली. १५ ऑक्टोबरला सिंदखेडराजा न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. उपरोक्त घटनेचा तपास ठाणेदार नीलेश ब्राह्मणे करीत आहेत.