कोरोना काळात संत गाडगे महाराज यांचे विचार प्रेरणादायी - समाधान शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:44 AM2021-02-25T04:44:28+5:302021-02-25T04:44:28+5:30

देऊळगावमही : गेल्या अनेक दशकांपासून संत गाडगे महाराज यांनी कुठल्याच सुखसुविधा उपलब्ध नसताना अज्ञान, अंधश्रद्धा यांना विरोध ...

Thoughts of Saint Gadge Maharaj during the Corona period are inspiring | कोरोना काळात संत गाडगे महाराज यांचे विचार प्रेरणादायी - समाधान शिंगणे

कोरोना काळात संत गाडगे महाराज यांचे विचार प्रेरणादायी - समाधान शिंगणे

Next

देऊळगावमही : गेल्या अनेक दशकांपासून संत गाडगे महाराज यांनी कुठल्याच सुखसुविधा उपलब्ध नसताना अज्ञान, अंधश्रद्धा यांना विरोध करीत स्वच्छतेचे महत्त्व गावोगावी सांगितले. त्यांचे विचार आजच्या कोरोना रोगाच्या काळात प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन समाधान भिकाजी शिंगणे यांनी केले.

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर, केमिस्ट, पत्रकार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समाधान शिंगणे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. गेल्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची संख्या ग्रामीण भागात अज्ञान, अंधश्रद्धा, स्वच्छतेअभावी रुग्णसंख्या वाढत आहे. त्यांचे विचार आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारे, त्यांचे कार्य व विचार कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी उपयुक्त प्रेरणादायी आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाधान शिंगणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी वैद्यकीय अधीक्षक जे. पी. ताठे, डॉ. सुभाष शिंगणे, डॉ. मनोहर शिंगणे यांची उपस्थिती होती. समाधान शिंगणे युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर, केमिस्ट व पत्रकार या कोरोना रोगाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. किशोर शिंदे, डॉ. आर. डी. टेकाळे, डॉ. भारत टेकाळे, डॉ. नारायण शिंगणे, डॉ. रमाकांत सपकाळ, डॉ. जाकिर, डॉ. सचिन सोनसळे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. कैलास उगले, प्रदीप जैन, गणेश मान्टे, शेख अजगर सुनील कोटेचा, गजानन मुंढे, संतोष ठेंग, प्रकाश साकला, अजित बेगानी, भगवान इंगळे, सतीश हिवाळे, संदीप ठेंग, संतोष जाधव, अमोल बोबडे, गजानन चोपडे, किरण शेळके, बळीराम शिंगणे, रवी जाधव, शेख इरफान, ज्ञानेश्वर वाकोडे, श्याम छबीले, नीलेश तायडे, अंबादास बुरकुल, सैयद अत्तर, उद्धव बनसोडे आदींचा सत्कार करण्यात आला. संचालन अभिजित शिंगणे यांनी केले, आभार प्रदर्शन अतुल बकातकार यांनी मानले.

Web Title: Thoughts of Saint Gadge Maharaj during the Corona period are inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.