नांदुरा -मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 04:42 PM2020-02-28T16:42:53+5:302020-02-28T16:42:59+5:30

रुंदीकरणा बाहेरील रस्त्यांच्या कडेवरील अनाठायी शेकडो वृक्षांची कत्तल सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Thousands of trees slaughtered in the work of widening road | नांदुरा -मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल

नांदुरा -मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : नांदुरा ते मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुमारे पाच महिन्यांपूर्वीच प्रारंभ झाला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये येणाऱ्या झाडांची कापणी करण्यात येत आहे.
रस्त्याच्या मधोमध येणाºया सोबतच काही रुंदीकरणा बाहेरील रस्त्यांच्या कडेवरील अनाठायी शेकडो वृक्षांची कत्तल सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून वन विभाग या सर्व प्रकाराची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरकारवाई करणे गरजेचे झाले आहे. नांदुरा ते मोताळा या रस्त्याच्या रुंदीकरण करून सुमारे सात मीटर रुंदीचा रस्त्याची निर्माण कार्य प्रारंभ झाले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मध्ये येणाºया झाडांची कापणी करण्याबाबत शासकीय स्तरावरून पत्र व्यवहार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे कापणीच्या कामाला प्रारंभ केला. सात मीटरचा रस्ता तयार होत असल्याने रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला पाच मीटर अंतरामध्ये येणारी झाडे तोडण्याबाबतची कारवाई करणे जरुरी होते. तसे न करता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनी यांनी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मध्ये नाहक झाडांची कत्तल केल्याचे दिसून येते.


नांदुरा ते मोताळा रस्ता रुंदीकरणाकरिता वृक्षतोडीची परवानगी देण्यात आलि आहे . परवानगी बाहेरील झाडांची कापणी झाली आहे काय याबाबतची चौकशी केली जाईल.
- आर. बि. कोंडेवार, आरएफओ, मोताळा विभाग

Web Title: Thousands of trees slaughtered in the work of widening road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.