हा तर अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना धमकावण्याच प्रकार - जालींधर बुधवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:59 PM2017-12-13T13:59:44+5:302017-12-13T14:02:19+5:30
बुलडाणा : कर्ज माफीला होत असलेला विलंब त्यातही शेतमालाचा कमी मिळत असलेला भाव आणि बोंडअळीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना कृषिपंपाच्या कनेक्शन कापण्याच्या नोटीसा मिळत आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकºयांना धमकावण्यासारखा असून तात्काळ याला रोखा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा शिवसेना घेईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत यांनी महावितरणाला दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

रब्बी हंगामात शेतकºयांना सिंचन विषयक सुविधांसाठी विद्युत अत्यावश्यक आहे. आधीच आर्थिक कंबरडे मोडलेले शेतकरी देयकांची पुर्तता करण्यांत यंदा सक्षम नाहीत. त्यातही महावितरण दिवसाऐवजी रात्री विद्युत पुरवठा करते. पुर्णक्षमतेने ही विद्युत दिल्या जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून होणाºया हल्ल्यात शेतकरी शेतमजूरांच्या जीवीताला धोका पोहचवतो. शिवाय सध्या शेतकºयांना महावितरण नोटीसा पाठवून त्यांना कृषि पंपाचे कनेक्शन कापण्याच्या एक प्रकारे धमक्या देत आहे. कृषिपंपाना देण्यात येणाºया बीलामध्येही मोठा घोळ आहे. ही बिले कशाच्या आधारावर दिले जातात याची सत्यता तपासणी होणे आवश्यक आहे. हा मनमानी प्रकार असून शेतकºयांचे कृषिपंप ऐन हंगामात कापल्यास आंदोलनाचा मार्ग शिवसेना स्विकारेल, असा इशारा जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी दिला आहे.