नुकसानग्रस्तांना मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- ठाकरे

By admin | Published: December 25, 2016 02:32 AM2016-12-25T02:32:49+5:302016-12-25T02:32:49+5:30

विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडून मलकापूर येथील दंगलग्रस्त भागाची पाहणी.

Threats will not fit till victims find help- Thackeray | नुकसानग्रस्तांना मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- ठाकरे

नुकसानग्रस्तांना मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- ठाकरे

Next

मलकापूर(जि. बुलडाणा), दि. २४- उद्भवलेल्या दंगलीदरम्यान शहरातील वाहने व दुकानांसह इतर नुकसानाची भरपाई त्या-त्या नुकसानग्रस्तांना देण्यात यावी, अशी मागणी करीत या मागणीचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करू, नुकसानभरपाई मिळेस्तोवर स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी करताना नुकसानग्रस्तांना दिली.
शहरातील जुन्या गावात मागील आठवड्यात उसळलेल्या दंगलीत अनेक वाहने, दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. तसेच वस्त्यांवर दगडफेकही झाली. ही घटना दुर्दैवी असून, घटनेदरम्यान नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ व शहराध्यक्ष राजू पाटील अशा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जखमी होऊनही जातीय तणाव शमविण्याचा प्रयत्न केला, ही बाब प्रशंसनीय असून, काँग्रेस कुठेही अन्याय होऊ देणार नाही, अन् जिथे कुठे अन्याय होत असेल, तिथे काँग्रेसच अन्यायग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभी राहते. घडलेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणीसुद्धा केली आहे, अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी जुन्या गावातील नागरिकांना भेटीदरम्यान दिली.
या पाहणी व भेटीदरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, बलदेवराव चोपडे, डॉ.अरविंद कोलते, अँड. हरीश रावळ, दिलीप देशमुख, नारायणदास निहलाणी, अँड. साहेबराव मोरे, राजू पाटील, हाजी रशिदखॉ जमादार, अँड.मजीद कुरेशी, अँड.जावेद कुरेशी, कपील राठी, राजेंद्र वाडेकर, श्याम राठी, नीलेश पाऊलझगडे, लक्ष्मणराव घुमरे, युसुफखाँ, अनिल गांधी, गोपाल राठी, अनिल जैस्वाल यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Threats will not fit till victims find help- Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.