३९ ग्रामपंचायतींपैकी तीन सरपंच अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:38 AM2017-10-04T00:38:28+5:302017-10-04T00:41:24+5:30
लोणार: तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील ३ ग्रामपंचायत सरपंच पद अविरोध झाल्याने आता ३६ जागांच्या सरपंच पदासाठी १0९ व सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात आहे त. सरपंच पद जनतेतून असल्यामुळे गावाच्या विकासासाठी सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी गावकरी मतदार सज्ज झाले असून, त्यांच्याही पारावर बैठका भरत आहेत. तर कॉर्नर मिटिंगमध्ये उमेदवार, गावपुढारी व पक्षाचे नेते व्यस्त दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

७ ऑक्टोबर रोजी सरपंच व सदस्यासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी गावागावात सरपंच पदाचे दावेदार हे मोर्चा बांधणीच्या कामाला लागले असून, आपापल्या मतदारांशी संपर्क साधून आहेत. ग्रामीण भागाशी निगडित आणि ग्रामीण भागाचा कणा असलेल्या या निवडणुकीमुळे चुरशीचे वातावरण तयार झाले आहे. पहिल्यांदाच सरपंच पद हे जनतेतून असल्यामुळे गावागावात शक्ती प्रदर्शन निर्माण सुरू झालेले दिसून येत आहे. ३९ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायत सरपंच पद व ५८ ग्राम पंचायत सदस्य अविरोध झालेले आहे. सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र भरलेल्या पैकी ७६ जणांनी माघार घेतली असून, सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या पैकी १५३ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी अर्ज माघार न घेतलेल्या गावात राजकीय वातावरण तापले आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक उमेदवारच असायला हवा यासाठी गावकर्यांनीही एकजूट दाखवायला सुरुवात केल्याने काही पक्ष कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येत आहे. गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणून गावात राबविणारा सुशिक्षित आणि प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी अनेक गावात पारावर गावकर्यांच्या बैठका बसत आहेत. यामुळे ‘चुका पदरात घ्या आणि एक शेवटची संधी द्या’ अशा गावपुढार्यांच्या भूलथापा ग्रामीण भागात सध्या ऐकावयास मिळ त आहेत.