तीन एकरावरील मका जळून खाक; वीज तारांमधील घर्षणाने लागली आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 02:33 PM2018-11-02T14:33:34+5:302018-11-02T14:34:00+5:30

नांदुरा :  तीन एकर मका चाऱ्यासह जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेदरम्यान सिरसोडी येथे घडली. विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्याने हा प्रकार घडला असून शेतकऱ्याचे जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे.

Three acres of crop burnt down | तीन एकरावरील मका जळून खाक; वीज तारांमधील घर्षणाने लागली आग 

तीन एकरावरील मका जळून खाक; वीज तारांमधील घर्षणाने लागली आग 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा :  तीन एकर मका चाऱ्यासह जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेदरम्यान सिरसोडी येथे घडली. विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्याने हा प्रकार घडला असून शेतकऱ्याचे जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे.
सिरसोडी येथील चेतन श्रीधर अनगाईत यांचे सिरसोडी शिवारातच गट क्र.१७२ मध्ये १.५२ हे.आर. शेत आहे. सदर शेतात त्यांची मक्याची पेरणी केली होती. कमी पाऊस असुनही मशागतीवर चांगलाच खर्च अनगाईत यांनी केल्याने मका पीक चांगल्या स्थितीत होते. काही दिवसांपुर्वी मक्याची सोंगणी करून शेतात गुळ (गंजी) लावुन ठेवण्यात आली होती. दिवाळीपुर्वी मका तयार करून बाजारात न्यावा व दिवाळीची व्यवस्था करावी, असे नियोजन असतानाच शुक्रवारी सकाळी ८ वाजेदरम्यान शेतातील लोंबकळलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्याने मक्याने पेट घेतला व काही वेळातच कणसांसह मका जळून खाक झाला. यावर्षी तालुक्यात दुष्काळ असताना शेतकरी आर्थिक विंवचनेत आहे. शिवाय जनावरांना चाराही मुबलक नसल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले आहे. अशावेळी चेतन अनगाईत यांच्यावर फार मोठे संकट कोसळले असून विद्युत वितरण कंपनी तसेच शासनाने याची गंभीर दखल घेत त्यांचे नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, अशी मागणी गावकरी शेतकºयांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three acres of crop burnt down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.