किटनाशकांमुळे जळाले तीन एकरातील कपाशीचे पीक, कृषी विभागाकडून तक्रार बेदखल
By विवेक चांदुरकर | Published: September 23, 2022 03:00 PM2022-09-23T15:00:09+5:302022-09-23T15:00:31+5:30
तालुक्यातील लाखनवाडा येथील शेतकर्याने चार दिवसांपूर्वी कपाशीवर किटकनाशकाची फवारणी केली.
खामगाव :
तालुक्यातील लाखनवाडा येथील शेतकर्याने चार दिवसांपूर्वी कपाशीवर किटकनाशकाची फवारणी केली. यामुळे तीन एकरातील कपाशीचे पीक जळाल्याने शेतकर्याचे नुकसान झाले आहे. शेतकर्याने कृषि विभागाकडे तक्रार केली. मात्र कृषि विभागाच्यावतीने तक्रारीची काेणतीही दखल घेण्यात आली नाही.
लाखनवाडा येथील प्रल्हाद रामचंद्र कराळे यांनी ३ एकर शेतात कपाशीची पेरणी केली. कपाशीचे पीक चांगले असताना त्यावर रस शोषण करणार्या किडींचा प्रादुर्भाव वाढला. किडींचा बंदोबस्त करण्याकरिता त्यांनी कृषी सेवा केंद्रमालकाच्या सल्ल्यानुसार महागड्या किटकनाशकाची फवारणी केली. मात्र, फवारणी केल्यावर दोन ते तीन दिवसांनी किटकांचा बंदोबस्त होण्याएेवजी कपाशीचे पूर्ण पीक जळाले आहे. शेतकर्याने याबाबत कृषि विभागाकडे तक्रार केली. संबंधित कंपनी व दुकानमालकाने नुकसानभरपाइ देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र कृषि विभागाच्यावतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. अद्याप कर्मचार्यांनी पीकाची पाहणी केली नाही. गत वर्षीपासून कपाशीला चांगला भाव आहे. त्यामुळे यावर्षी कपाशीतून भरगोस उत्पन्न होइल अशी शेतकर्याला अपेक्षा होती. मात्र किटकनाशकामुळे कपाशीने जळाल्याने शेतकर्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.