बुलडाणा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी ई पीक पाहणीपासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 10:59 AM2021-09-15T10:59:18+5:302021-09-15T10:59:26+5:30
E-crop inspection : ३ लाख ८९ हजार शेतकरी ई पीक नाेंदणीपासून दूरच असल्याचे चित्र आहे.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पिकाची नाेंद करण्याची सुविधा शासनाने सुरू केली आहे. त्यासाठी ॲपही विकसित करण्यात आले आहे. मात्र, नेटवर्कसह अनेक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८९ हजार शेतकरी ई पीक नाेंदणीपासून दूरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ई पीक पाहणीसाठी जनजागृती करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर पीक नाेंद करता यावी, यासाठी शासनाच्या वतीने ई पीक नाेंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ॲपही विकसित करण्यात आले आहे. मात्र, ॲप सुरूच हाेत नसल्याने तसेच विविध कारणांमुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी नाेंदणीच करू शकले नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात पीक घेणारे ५ लाख ४१ हजार २४ शेतकरी आहेत, तसेच रब्बी हंगामात शेती करणारे एकूण २ लाख ५० हजार २७५ शेतकरी आहेत. एकूण ७ लाख ९१ हजार २९९ शेतकऱ्यांची नाेंद आहे. त्यापैकी ३३ टक्के शेतकऱ्यांनीच नाेंदणी केली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत २ लाख शेतकऱ्यांनीच नाेंदणी केली, १ लाख ८५ हजार जणांनी नाेंद केली.