सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:38 AM2021-02-20T05:38:40+5:302021-02-20T05:38:40+5:30
अंढेरा पोलीस स्थानकअंतर्गत येणाऱ्या चंदनपूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर जलालसिंग इंगळे यांनी तक्रारी अंढेरा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार ...
अंढेरा पोलीस स्थानकअंतर्गत येणाऱ्या चंदनपूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर जलालसिंग इंगळे यांनी तक्रारी अंढेरा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार ज्ञानेश्वर इंगळे व विठ्ठल भगवान इंगळे यांच्यासह गावातील इतर शेतकरी हे त्यांची
सोयाबीन दरवर्षी धोत्रा भनगोजी येथील व्यापारी गजानन बाळकृष्ण इंगळे यांचाकडे त्यांची पत्नी रंजना गजानन इंगळे यांचे सामी ट्रेडर्स व मुलगा किरण गजानन इंगळे यांचे नावाने असलेले किरण ट्रेशन या नावाने असलेल्या धान्य खरेदीचे लायसन्सवर शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून १० ते १५ दिवसांनी पैसे देतात. म्हणून ज्ञानेश्वर इंगळे यांच्या ओळखीने घरालील ९७ क्विंटल १६ किलो सोयाबीन गजानन बाळकृष्ण इंगळे यांना मोजून दिले. त्यावेळी सोयाबीन मोजणीसाठी गजानन बाळकृष्ण इंगळे (रा. धोत्रा भनगोजी), अरुण पवार, राजू पवार (रा. शेलुद) व तेजराव सरोदे (रा. धाड) हे चंदनपूर येथे आले. तेव्हा सोयाबीनचा भाव ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे ठरला होता. या धान्याची रक्कम १५ दिवसात आणून देतो, असे असे व्यापारी गजानन बाळकृष्णा इंगळे यांनी सांगितले होते. त्यावेळी गावातील राजू सीताराम इंगळे, प्रल्हाद बाजीराव इंगळे, सिध्देश्वर बाजीराव इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, विलास जगन इंगळे, दत्तात्रय आत्माराम इंगळे, अनंत तुकाराम इंगळे, समाधान पांडुरंग इंगळे, भगवान इंगळे (सर्व रा. चंदनपूर) यांच्या समक्ष त्यांनी सोयाबीन पोत्याचे वजन लिहिलेल्या चिठ्ठ्या दिल्या. त्यानंतर १५ दिवसांनी व्यापारी गजानन बाळकृष्ण इंगळे यांच्याकडे शेतकरी सोयाबीनचे पैसे आणण्यास गेले असता त्याने यांचे साले अरुण पवार, राजू पवार (रा. शेलूद) याच्या नावाचे अकाऊंट
असलेला धनादेश दिला. परंतु खात्यात चौकशी केली असता व्यवस्थापकांनी या खात्यात पुरेशी रक्कम जमा नसल्यामुळे पैसे दिले जात नाहीत, असे सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आरोपी गजानन बाळकृष्ण इंगळे, रंजना गजानन इंगळे, किरण गजानन इंगळे (रा. धोत्रा भनगोजी) व अरुण पवार, राजू पवार, तेजराव सरोदे धाड या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपी असलेले गजानन बाळकृष्ण इंगळे, राजू पवार, तेजराव सरोदे यांना गजाआड केले.