तीन दिवसांत तीन म्हशींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:35+5:302021-02-14T04:32:35+5:30
दादूलगव्हाण येथी शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने दूध उत्पादनासाठी दुधाळ जनावरांचे संगोपन करणे सुरू केले आहे. अशातच ...
दादूलगव्हाण येथी शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने दूध उत्पादनासाठी दुधाळ जनावरांचे संगोपन करणे सुरू केले आहे. अशातच बुधवारपासून गावातील विलास प्रल्हाद कंकाळ यांची एक म्हैस, उमेश कडुबा सोनवणे यांची एक म्हैस आणि मिलिंद दत्तात्रय कंकाळ यांची एक म्हैस अशा तीन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यासोबतच रामदास आत्माराम शेजूळ यांची गायसुद्धा याच प्रकारच्या लक्षणांमुळे आजारी आहे. जनावरेही भिंतीला धडक देत आहेत. त्यातच त्यांचा मृत्यू होत आहे, असा प्रकार दादूलगव्हाण येथे समोर आला आहे.
प्रथमदर्शी या जनावरांच्या मृत्यूचे कारण हे रेबीज असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्यापासून आपल्या जनावरांचे संरक्षण करावे.
-ज्योत्स्ना भगत, पशुधन विकास अधिकारी, दादूलगव्हाण.