तीन टक्के मुद्रांक शुल्क माफीमुळे व्यवहारांना चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:37 PM2020-10-09T12:37:40+5:302020-10-09T12:38:12+5:30
Buldhana, Real Estate मुद्रांक शुल्क माफीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होत आहे
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मध्यंतरी देण्यात आलेल्या तीन टक्के मुद्रांक शुल्क माफीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होत असून जवळपास २० टक्क्यांनी व्यवहार वाढल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, अमरावती, नागपूर, मुंबई, पुण्यासह राज्यातील अन्य भागात कौटुंबिकस्तरावर प्रलंबीत असलेले व्यवहारही वाढण्यास मदत झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर नाही पण अर्थव्यवस्था सुरळीततेच्या मार्गावर येण्यास मदत होत आहे.
परिणामस्वरुप मधल्या काळात स्थिरावलेल्या किंवा मंदीत गेलेली अर्थव्यवस्था बऱ्यापैकी मार्गी लागण्यास मदत होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात त्याचा वरकरणी अपेक्षीत परिणाम जाणवत नसला तरी व्यवहार वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. विशेष म्हणजे कौटुंबिकस्तरावर प्रारंभीच्या मुद्रांक शुल्काची स्थिती पाहता रखडलेले व्यवहार पुर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे एकंदरीत व्यवहारावरून दिसून येते. त्यामुळे व्यापक प्रमाणावर नाही परंतू बºयापैकी ती रुळावर येण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. वास्तविक तीन टक्के मुद्रांक शुल्क माफी दिलेली असतानाच सप्टेंबर महिन्याच्य पहिल्या आठवड्यात रेडीरेकनरच्या दरात जिल्ह्यात १.४५ टक्क्यांनी सरासरी वाढ करण्यात आली होती. त्यामुले एकंदरीत स्थिती ही व्यवहाराच्या पातळीवर सारखीच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तीन टक्के मुद्रांक शुल्क माफीचे काही छुपे पैलुही यामुळे समोर आले असून त्याचा फायदा हा जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहाराला झाला. प्रामुख्याने कौटुंबिकस्तरावरील व्यवहार जादा मुद्रांक शुल्कांमुळे वर्षानुवर्षे रखडलेले होते. ते आता वेगाने ही मुद्रांक शुल्क माफी झाल्यामुळे होत आहे. प्रामुख्याने हे व्यवहार वाढले आहेत. यासोबतच कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाले होते. ते आता पुर्वपदावर येत आहे. सोबतच गृहनिर्माण क्षेत्रातही यामुळे आता तेजी येण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्यातही यावर्षी २७६ कोटींचा गृहनिर्माण क्षेत्रात पतपुरवठा करण्याचे उदिष्ठ आहे.