मोताळा येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन बालके जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:39 AM2018-02-26T01:39:40+5:302018-02-26T01:39:40+5:30
मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयामागील परिसरात रविवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन चिमुकले जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

येथील ग्रामीण रुग्णालयामागील परिसरात रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने जोरदार धुमाकूळ घातला. सदर कुत्र्याच्या हल्ल्यात अंश वराडे (५), साबिका इरम (३), शेख अजीम शेख कलीम (३ तिघे रा. मोताळा) हे तिघे चिमुकले जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तिघांना बुलडाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, सदर कुत्र्याने परिसरा तील एका बकरीलाही चावा घेतला. परिसरातील शेख आबिद, इकबाल जमादार, शेख जावेद, रईस कुरेशी, नाजीम शेख, अजहर खान, राजू सोळंके, फिरोज खाटीक, मोहम्मद कुरेशी, करीम कुरेशी, इमरान कुरेशी व सहकार्यांनी या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.