बुलडाणा जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, ७६८ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 12:03 PM2021-03-21T12:03:46+5:302021-03-21T12:04:07+5:30
CoronaVirus News शनिवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३५ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३५ झाली आहे. दुसरीकडे शनिवारी ७६८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ४,३६४ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी ३,५९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ७०, सुंदरखेड ३, शिरपूर २, देऊळघाट ३, सागवान २, रायपूर २, धाड ५, माळवंडी ४, खामगाव ६८, ढोरापगाव २, टेंभुर्णा ४, पारखेड ९, माक्ता १०, धानोरा ५, वडनेर ६, चांदुरबीस्वा ५, मलकापूर २६, लासुरा ४, चिखली २२, पळसखेड २, किन्ही नाईक २, बेराळा २, अमडापूर ३, सिं. राजा ८, साखरखेर्डा १५, दुसरबीड २, आडगाव राजा ११, शेळगाव रा.९, कि. राजा २, भोसा ३, देवखेड २, शिंदी २, शेंदुर्जन ४, सवडत २, काबरखेड २, धा. बढे ३, पान्हेरा ५, वारी २, उऱ्हा ४, मोताळा १९, शेगाव ६८, जवळा ५, चिंचोली ५, पहूरझीरा २, जळगाव जा. २९, आसलगाव ४, मांडवा १२, देऊळगाव राजा ३६, अंढेरा ७, दे. मही ५, गोंधनखेड २, पांगरी ४, सुरा २, जांभोरा ३, सिनगाव जहां.७, निमखेड ३, खैराव २, लोणार ३, बिबी ७, खळेगाव २, कोरेगाव ३७, मेहकर ८ पेनटाकाळी ४, रत्नापूर ५, मुंदेफळ ४, पिंप्री माळी ४, नांदुरा २७, आणि जाळीचा देव (जालना) येथील ५, अकोला १, औरंगाबाद १, बाळापूर १, हिंगोली १, दिग्रस (जि. यवतमाळ) येथील एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, मोताळा तालक्यातील पिंपळ पाटी येथील ७१ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा शहरातील जुनागाव परिसरातील ८४ वर्षीय व्यक्ती आणि नांदुरा येथील ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. दुसरीकडे ५३८ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या आता ५ हजारांच्या घरात पोहोचल असून कोवीड केअर सेंटरही कमी पडत असल्याचे चित्र आहे.
५०२९ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५०२९ असून, एकूण रुग्णांची संख्या २९ हजार ३०५ झाली आहे. त्यापैकी २४ हजार ४१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शनिवारी ४४३८ जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत होते. आतापर्यंत जिल्ह्यात २३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.