मामासह दोन भाच्यांचा धरणात बुडून करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 10:29 AM2021-05-18T10:29:40+5:302021-05-18T10:29:40+5:30
Buldhana News : मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करूण अंत झाल्याची घटना मंगळवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली.
Next
ल कमत न्युज नेटवर्कजळगांव जामोद: तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करूण अंत झाल्याची घटना मंगळवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे. पुणे येथे नोकरीवर असलेला विनायक गाडगे (२७), त्याच्या काका चा मुलगा तेजस गाडगे (१८) व त्यांचे दाताळा येथील मामा नामदेव वानखडे (४३) तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले.परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केला. घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याचे काठावर आढळून आले. तो पर्यंत रात्र झाल्यानें अंधारात शोध मोहिम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मुतदेह तरंगताना दिसले. पट्टीच्या पोहणार्यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढले.