तीन ग्रामपंचायती अविराेध; ४२२ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:24+5:302021-01-08T05:51:24+5:30

देऊळगाव राजा : तालुक्यातील २६ पैकी तीन ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून, एकूण १९९ जागांपैकी ६२ जागा अविरोध झाल्या ...

Three gram panchayats unopposed; 422 candidates in the fray | तीन ग्रामपंचायती अविराेध; ४२२ उमेदवार रिंगणात

तीन ग्रामपंचायती अविराेध; ४२२ उमेदवार रिंगणात

googlenewsNext

देऊळगाव राजा : तालुक्यातील २६ पैकी तीन ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून, एकूण १९९ जागांपैकी ६२ जागा अविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता उर्वरित १३७ जागांसाठी निवडणूक होत असून, त्याकरिता ४२२ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत.

अविरोध झालेल्या तीन ग्रामपंचायतीमध्ये पिंपळगाव बुद्रुक, नागनगाव आणि पाडळी शिंदे या गावांचा समावेश आहे. या तीन गावांतील नागरिकांनी एकतेचे दर्शन घडवत गावातील गटा-तटाच्या राजकारणाला मूठमाती देत अशक्य वाटणारी ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध करून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. निवडणूक होऊ घातलेल्या २३ ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील देऊळगाव मही ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी दोन पॅनल आमने-सामने उभे ठाकले आहेत. दोन्ही पॅनलचे नेतृत्व धुरंधर राजकारणी करत असल्याने ही निवडणूक रंगतदार व चुरस निर्माण करणारी ठरणार आहे. जि.प.चे सभापती रियाजखान पठाण यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. कित्येक वर्षांपासून देऊळगाव महीच्या ग्रामपंचायतवर पठाण गटाचे निर्विवाद वर्चस्व कायम आहे. त्याखालोखाल अंढेरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गिरोली खुर्द, तुळजापूर, पळसखेड झाल्टा,निमगाव गुरु, पांगरी-वाडी, खल्याळ गव्हाण, देऊळगाव मही, डोढरा, टाकरखेड वायाळ, बायगाव बुद्रुक, मेंडगाव, पिंप्री आंधळे, सावखेड भोई, जवळखेड, उंबरखेड, चिंचोली बुरकुल, मेहुणा राजा, बोराखेडी बावरा, शिवणी आरमाळ, आळंद,अंढेरा, सावखेड नागरे, मंडपगाव २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी २६ ग्रामपंचायतींमधून ६२ उमेदवार अविरोध निवडून आले. त्याचबरोबर तीन ग्रामपंचायती अविरोध झाल्याने प्रशासनावरचा ताण कमी होण्यास मदत झाली. आता प्रत्यक्षात निवडणूक प्रचाराला प्रारंभ झाला असून, येत्या १५ जानेवारीला १३७ जागांसाठी मतदान होणार आहे.

Web Title: Three gram panchayats unopposed; 422 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.