कोरोनाचे जिल्ह्यात तीन बळी, २१५ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:06 AM2021-02-21T05:06:03+5:302021-02-21T05:06:03+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०३० जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१५ ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०३० जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ८१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २९, पोखरी एक, केसापूर चार, दुधा एक, करडी दोन, शेगाव ११, घाणेगाव एक, सुटाळा बु. एक, खामगाव ३६, नांदुरा दोन, पोटळी तीन, पळशी एक, सोनाळा एक, हातणी दोन, किन्होळा तीन, टाकरखेड हेलगा एक, खैरव दोन, चांधई एक, अंत्री एक, पळसखेड एक, गोद्री तीन, पेनसावंगी एक, जांभोरा एक, अंचरवाडी एक, पिंपळगाव सोनाळा एक, मरखेडा दोन, दे. घुबे एक, वळती एक, चिखली २३, मलकापूर २६, उमाळी एक, सारोळा मारोती एक, सारोळा पीर एक, दे. राजा सात, डोढ्रा एक, सिनगाव जहागीर एक, अंढेरा एक, कळमेश्वर एक, डोणगाव एक, जानेफळ सहा, बऱ्हाई तीन, मेहकर दोन, सिं. राजा एक, शेंदुर्जन एक, सावरगाव एक, आसलगाव तीन, झाडेगाव दोन, लोणार दहा, पिंपळखुटा एक, सोनुना एक, अैारंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील एक, अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील एक याप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या आहे.
दरम्यान, शनिवारी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील सावळा येथील ७० वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील केळवद येथील ७५ वर्षीय व्यक्ती आणि चिखली शहरातील एका ६५ वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे. पाच दिवसात नऊजणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दुसरीकडे १०१ जणांनी शनिवारी कोरोनावर मात केली. यामध्ये बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधील ५५, देऊळगाव राजा पाच, चिखली : आठ, नांदुरा : तीन, जळगाव जामोद : सात, मेहकर : एक, सिं. राजा : तीन, मलकापूर : सात, लोणार : एक, खामगाव : आठ, शेगाव : दोन, मोताळा येथील एकाची सुटी झाली आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार १९६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
--१९२२ अहवालाची प्रतीक्षा--
कोरोनाच्या १,९२२ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १५ हजार ८४५ झाली असून, त्यापैकी १,१६३ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत १८६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.