पातूर तालुक्यातील अंबाशी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 02:54 AM2017-04-02T02:54:45+5:302017-04-02T02:54:45+5:30
प्रभारी सरपंच योगेश लाहोळे यांच्याकडे राजीनामे सादर
पातूर (अकोला), दि. १-: तालुक्यातील अंबाशी ग्रामपंचायतचे शेख युनूस शेख मुराद (पटेल), रिता बाळकृ ष्ण लाहोळे व शीतल बाळू तिवाले या तीन सदस्यांनी १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अंबाशीचे प्रभारी सरपंच योगेश लाहोळे यांच्याकडे राजीनामे सादर केले. अंबाशी ग्रा.पं.च्या सन २0१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सात सदस्य निवडून आले होते. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती-जमातीचे असल्यामुळे सर्वानुमते ललिता काशीनाथ मसरे यांची सरपंचपदी निवड केली होती; परंतु शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच ललिता मसरे यांचे सदस्यत्व आणि सरपंचपद अमरावती आयुक्तांनी १२ जुलै २0१४ रोजी रद्द केले होते. त्यामुळे उपसरपंच योगेश अजाबराव लाहोळे यांच्याकडे तेव्हापासून सरपंच पदाचा पदभार होता.