आधार कार्डसाठी तीन महिन्यांची मुदत
By admin | Published: November 17, 2014 12:51 AM2014-11-17T00:51:04+5:302014-11-17T00:51:04+5:30
अनुदानावर सिलिंडर : पहिल्या टप्प्यात ५४ जिल्ह्यात योजना लागू.
बुलडाणा : येत्या १ जानेवारी २0१५ पासून देशभरात सुरू होणार्या संशोधित ह्यडायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एलपीजीह्ण (डीबीटीएल) योजनेसाठी ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड नाही अशा ग्राहकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड नसलेल्या ग्राहकांनाही सुरुवातीचे तीन महिने बँकेतून रोख अनुदान मिळेल. नंतर मात्र त्यांना आधार कार्ड काढावेच लागेल.
गॅस सिलिंडरवरील अनुदान मिळविण्यासाठी पूर्वी ग्राहकांजवळ आधार कार्ड आणि बँक खाते असणे गरजेचे होते; परंतु शासनाने या योजनेचे संशोधन करून ग्राहकांना समस्या निर्माण होऊ नये यासाठी ह्यडायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एलपीजीह्ण (डीबीटीएल) योजना सुरू केली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ नोव्हेंबरला ५४ जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर देशभरात १ जानेवारी २0१५ पासून ही योजना राबविण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांनी या पूर्वीच्या योजनेत सहभागी होऊन रोख अनुदान प्राप्त केले आहे अशा ग्राहकांना नव्याने काहीच करण्याची गरज नाही. ह्यडीबीटीएलह्ण योजनेत ज्या ग्राहकांजवळ आधार कार्डचा क्रमांक नाही असे ग्राहक आधार कार्ड न दाखविता बँकेतून रोख रक्कम मिळवू शकतात. आधार कार्ड आल्यानंतर त्यांच्या आधार कार्ड क्रमांकावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल. ज्या ग्राहकांजवळ बँक खाते आणि आधार कार्ड क्रमांक दोन्ही नाही अशा ग्राहकांना पहिल्या तीन महिन्यात अनुदान देण्यात येईल; परंतु या तीन महिन्यात त्यांना आधार कार्ड आणि बँक खाते काढावे लागेल. तीन महिन्यात आधार कार्ड आणि बँक खाते न उघडल्यास या ग्राहकांना पुन्हा तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे.