विवाहितेवर अत्याचारप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 10:29 PM2020-03-08T22:29:33+5:302020-03-08T22:29:45+5:30
खामगाव शहर पोलीस स्टेशनला पिडीत महिलेने ८ मार्चरोजी दुपारी तक्रार दाखल केली.
खामगाव: कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. खामगाव शहर पोलीस स्टेशनला पिडीत महिलेने ८ मार्चरोजी दुपारी तक्रार दाखल केली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील लक्कडगंज भागातील रहिवाशी विवाहित महिला ७ मार्चरोजी संध्याकाळी ७.३० वाजता रस्त्याने जात असतांना हेमंत रेडे (वय ३०) याने तिचा रस्ता अडवून अश्लिल शिविगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ती रिपोर्ट देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये निघाली. तेव्हा एक महिला त्याठिकाणी आली. व तिला तक्रार देवू असे म्हणाली. तेव्हा त्याठिकाणी एक कार आली. तिला कारमध्ये बसवून कोल्ड्र्ींग पाजले. तिला घराकडे न नेता शेगाव रोडने घेवून गेले. त्यातून महिला व मो. समीर मो. नजीर (वय २३) हा पुढे गेले.
थोड्यावेळाने त्याठिकाणी शेख आलम शेख साबीद (वय २५) हा आला. त्याने विवाहितेवर अत्याचार केला. हा प्रकार सुरु असताना त्याठिकाणी सोबतची महिला पोहचली. तिने त्याला आवरले. अशाप्रकारच्या तक्रीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी हेमंत उर्फ बाळा रेडे, मो. समीर मो. नजीर, शेख आलम शेख साबीद व १ महिला या चार आरोपीविरुध्द कलम ३७६, १०९, ३२३, ५०४ भादंविनुसार तसेच ३ (१) अॅक्ट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एसडीपीओ प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनिल अंबुसकर हे करीत आहेत.