देऊळघाट येथे नदीत बुडणाऱ्या तिघांना वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:10 IST2019-11-02T18:10:29+5:302019-11-02T18:10:36+5:30
तीन युवक बुडत असल्याचे समजताच उपस्थितांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले.

देऊळघाट येथे नदीत बुडणाऱ्या तिघांना वाचविले
बुलडाणा : तालुक्यातील देऊळघाट येथील पैनगंगा नदीत शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेले तीन युवक बुडत असल्याचे समजताच उपस्थितांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांच्यावर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फुरकान अहमद अब्दूल वाहब उर्फ बब्बू (२८), जुनैद हफीज देशमुख (२७), शेख जाकीर शेख युनूस (२७) अशी युवकांची नावे आहेत. दरम्यान माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, नायब तहसीलदार पवार, मंडळ अधिकारी राऊत, तलाठी कोळसे यांनी दवाखान्यात जाऊन युवकांची विचारपूस केली.