मेहकर बाजार समितीत सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 07:37 PM2017-10-05T19:37:42+5:302017-10-05T19:39:58+5:30
मेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
उध्दव फंगाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
मेहकर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी अधिक होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस चांगला पडला असला तरीपण त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांवर झाला आहे. अनेक शेतकºयांना एका एकरामध्ये केवळ ३ ते ४ क्विंटलची झडती लागली आहे. शेतकºयांना विविध बँकांकडून पेरणीच्या वेळेवर पिककर्ज मिळाले नसल्याने बहुतांश शेतकºयांनी उसनवार करुन तर उधारीवर बि-बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केली आहे. मात्र पावसाने सुद्धा वेळेवर साथ दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पिकांचे उत्पादन झाले नाही तर बाजारात सोयाबीनला २ हजार ५०० रुपये ते २ हजार ८०० रुपयेच भाव आहे. उडीद, मूग, तूर, चना, गहू या पिकांना सुद्धा भाव नाहीत. शेतात पेरणीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघतो का नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तर पेरणीसाठी लोकांकडून आणलेले पैसे, इतर उसनवार कशी फेडावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. नुकताच दसरा सण झाला असून दिवाळी अवघ्या काही दिवसावर आली आहे. पिकांच्या उत्पादनात झालेली घट, बाजारात पिकांना भाव नसणे, यामुळे दिवाळी साजरी कशी करायची या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे शासनाने आता शेतकºयांच्या पिकांना चांगला भाव देऊन शेतकºयांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, हीच अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
सोयाबीनचे दिड कोटी अनुदान अद्याप आलेच नाही
४मागीलवर्षी सोयाबीनची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती. परंतु बाजारात सोयाबीनला भाव नव्हते. त्यामुळे शासनाने शेतकºयांना मदत करण्याच्या उद्देशाने सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे हजारो शेतकºयांनी या अनुदानासाठी नोंदणी करुन दिलेली आहे. मात्र गेल्या ७ ते ८ महिन्यापासून या अनुदानाचे मेहकर तालुक्यातील जवळपास दिड कोटी रुपये शासनाकडे थकीत असून शासनाच्या निष्काळजीमुळे शेतकरी मात्र परेशान झाले आहेत.