विनापावती रेती वाहतूक करणारे तीन वाहने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:37+5:302021-04-30T04:43:37+5:30
तीन वाहनधारकांकडे कोणत्याही प्रकारची पावती आढळून न आल्याने २८ एप्रिल रोजी वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयासमोर ...
तीन वाहनधारकांकडे कोणत्याही प्रकारची पावती आढळून न आल्याने २८ एप्रिल रोजी वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयासमोर लावण्यात आले.
मराठवाड्यातील रेती घाटातून, तसेच पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या उपसा करून रेतीमाफिया लोणार मार्गे विनापावती रेती वाहतूक करतात. महसूल विभागाच्या तपासणी पथकासमोरुन न थांबता भरघाव भेगाने वाहने पळवितात. तहसीलदर सैपन नदाफ यांनी स्वत: रेती वाहनाची तपासणी केली असता, टिप्पर क्र.एम.एच.२१ बिबी ३९५६, एम.एच.२८ बीबी ३०७९ व एम.एच.२१ बी.एच. ५२० या वाहन चालकाजवळ कोणत्याही प्रकारची पावती आढळून आली नसल्याने दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले. प्रत्येकी वाहनधारकांना १ लाख २२ हजार रुपये याप्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.