बोर्डी नदीच्या पुरात बापलेकासह तिघे वाहून गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 04:21 PM2020-09-21T16:21:37+5:302020-09-21T16:21:45+5:30
गजानन रणशिंगे यांचा मृतदेह दुपारी आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बोर्डी नदीला आलेल्या पुरात खामगाव तालुक्यातील माक्ता कोक्ता येथील बापलेकांसह तिघेजण वाहून गेले. ही घटना सोमवारी सकाळी ११:३० वाजता दरम्यान माक्ता कोक्ता शिवारात घडली. या घटनेमुळे माक्ताकोक्ता येथे एकच खळबळ उडाली आहे.
माक्ताकोक्ता येथील गजानन लहानु रणशिंगे(४०) आणि त्यांचा मुलगा राहुल गजानन रणशिंगे (१६) दोघे बापलेक आणि दिलीप नामदेक कळसकार (४३) असे तिघे जण बकºया चारण्यास गेले होते. दरम्यान, बोर्डी नदीला अचानक आलेल्या पुरात तिघेजण वाहून गेलेत. यापैकी गजानन रणशिंगे यांचा मृतदेह दुपारी आढळून आला. उर्वरित दोघांचा शोध आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून घेतल्या जात आहे. खामगाव आणि परिसरात आलेल्या पावसामुळे नदी, नाले ओंसडून वाहत आहेत. अशातच काही नदी नाल्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.