कर्नाटकमध्ये झालेल्या अपघात देऊळगाव राजाचे तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:03 PM2018-08-20T18:03:39+5:302018-08-20T18:05:37+5:30

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : पर्यटनासाठी गेलेल्या तरूणांच्या गाडीला भीषण अपघात होवून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Three youth of deulgaon raja killed in an accident in Karnataka | कर्नाटकमध्ये झालेल्या अपघात देऊळगाव राजाचे तीन ठार

कर्नाटकमध्ये झालेल्या अपघात देऊळगाव राजाचे तीन ठार

googlenewsNext
ठळक मुद्देअपघात सोमवारी सकाळी ३.३० ते ४ वाजता दरम्यान कर्नाटक राज्यातील कोप्पाल जिल्ह्यात असलेल्या मुनीराबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला. मृतकामध्ये देऊळगाव राजातील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. लोखंडी खांब गाडीला घासल्याने गाडीचा पत्रा फाटून आतमध्ये बसलेले सातही जण मार लागून गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : पर्यटनासाठी गेलेल्या तरूणांच्या गाडीला भीषण अपघात होवून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात सोमवारी सकाळी ३.३० ते ४ वाजता दरम्यान कर्नाटक राज्यातील कोप्पाल जिल्ह्यात असलेल्या मुनीराबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला. मृतकामध्ये देऊळगाव राजातील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. देऊळगावराजा शहरातून १५ आॅगस्टच्या रात्री जीप क्र.एम.एच.३० ए.एफ ४७७४ या गाडीने डॉ.सागर मधुकर गवई (वय ३५) वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय दे.राजा, भरत बावणे (वय ३५) प्रयोगशाळा सहाय्यक प्रा.आ.केंद्र धाड, फैजान हाफीज दुर्राणी उर्फ बाबा (३५) रा.सिव्हील कॉलनी देऊळगावराजा, जयेश ईश्वर लाहोरे (वय ३५) रा.मानसिंगपूरा दे.राजा, मिर्झा मोहीज अल्लाखान उर्फ राजी मिर्झा मतीउल्लाखान (वय ३७) रा.मानसिंगपूरा दे.राजा, माजीद बेग मिर्झा इजाज बेग मिर्झा (वय ३७) रा.जाफ्राबाद आणि गाडीचा चालक अश्विन चंद्रहर्ष जाधव रा.सुंदरखेड बुलडाणा असे सात जण उटी, म्हैसूर व तिरूपती येथे पर्यटनासाठी गेले होते. गेले पाच दिवस पर्यटनाचा आनंद घेवून रविवारी दिवसभर ते म्हैसूरला होते. रविवारी रात्री जेवण आटोपून ते सर्वजण गाडीने देऊळगावराजासाठी परत निघाले. सोमवारी पहाटे सकाळी ३.३० ते ४ वाजता दरम्यान सुमारास कनार्टकमधील वानाबल्लारी ओलांडून कोप्पाल जिल्ह्यात नॅशनल हायवे क्रमांक ५० वर जीप मार्गक्रमण करत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रथम गाडी रस्ता दुभाजकाला धडकली. भरधाव वेगात असल्याने गाडी अनियंत्रीत होवून सर्व्हिस रोडच्या मधोमध घुसली. यामध्ये एका बाजुला सिमेंटचे खांब व दुसºया बाजूला लोखंडी खांब गाडीला घासल्याने गाडीचा पत्रा फाटून आतमध्ये बसलेले सातही जण मार लागून गंभीर जखमी झाले. भर पहाटे अपघात घडल्याने प्राथमिक मदत व उपचार मिळण्यास विलंब झाला. यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या सात जणांपैकी डॉ.सागर मधुकर गवई, भरत बावणे आणि फैजान हाफीज दुर्राणी उर्फ बाबा या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मुनीराबाद पो.स्टे.चे अधिकारी व पोलिस कर्मचारी दाखल झाल्यानंतर मृतक व गंभीर जखमींना मुनीराबादच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी चालक अश्विन जाधव, जयेश लाहोरे, माजीद बेग मिर्झा, मोहीजउल्लाखान मिर्झा उर्फ राजी यांचेवर उपचार सुरू आहेत. मुनीराबादच्या पोलिसांनी जखमींकडून घेतलेल्या मोबाईलवरून या दुर्देवी अपघाताची माहिती देऊळगावराजा कुटुंबाला कळवली. त्यानंतर जखमी व मृतकाचे नातेवाईक व मित्र मुनीराबाद (कर्नाटक) कडे रवाना झाले. या अपघाताचे वृत्त देऊळगावराजा शहरात पसरताच जागोजागी लोकांची गर्दी झाली. या अपघातात तीन तरूणांचे निधन झाल्याने शहरात शोककळा पससरली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three youth of deulgaon raja killed in an accident in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.