लोणार तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चार दुकाने फोडली
By Admin | Published: May 10, 2017 07:16 AM2017-05-10T07:16:39+5:302017-05-10T07:16:39+5:30
८ मेच्या रात्री झालेल्या चोरीमध्ये एकूण अंदाजे २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
लोणार : शहरातील लोणी मार्गावर खटकेश्वर नगरमधील ओम साई ई -महासेवा केंद्र आणि कुंभारे विमा सेवा केंद्रामध्ये ८ मेच्या रात्री झालेल्या चोरीमध्ये एकूण अंदाजे २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. ९ मे रोजी सकाळी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.
लोणार-लोणी मार्गावर असलेल्या खटकेश्वर नगरमध्ये भारत दराडे यांचे ओम साई ई-महासेवा केंद्र असून, त्या ठिकाणी भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रही चालविले जाते. यामुळे त्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार होतात. ८ मे रोजी लग्नसराई दाट असल्यामुळे भारत दराडे रात्री कार्यालयात येऊ शकले नाहीत. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी ८ मे रोजीच्या रात्री कार्यालयाचे शटर वाकवून चोरी केली. पैसे वाटप झाल्याने कार्यालयात असलेले केवळ ४ हजार ५०० रुपये चोरीला गेले. त्यानंतर शेजारीच असलेल्या कुंभारे विमा सेवा केंद्राच्या कार्यालयाचेही कुलूप तोडून २२ हजार ५०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. ९ मेच्या सकाळी हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी भारत दराडे यांना दूरध्वनीवरून कळविले. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. पुढील कारवाई पो.उ.नि. उकंडराव राठोड करीत आहेत