बुलडाणा जिल्ह्यात थंडीने हुडहुडी
By admin | Published: December 29, 2014 12:10 AM2014-12-29T00:10:56+5:302014-12-29T00:10:56+5:30
जनजीवन विस्कळीत ; पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली.
बुलडाणा : गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या कडाक्याची तीव्रता अंशत: कमी होत आहे. जिल्ह्यातील २७ आणि २८ डिसेंबर रोजी ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून सर्वत्र थंडीचा कडाका वाढत आहे. २१ डिसेंबरपर्यंंत किमान तापमानाची ११ अंशपर्यंत नोंद होती. २२ आणि २३ डिसेंबर रोजी १0 अंशापर्यंंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर दोन दिवस थंडीने थोडी उसंत घेतली. २३ ते २६ डिसेंबरदरम्यान पारा ११ पासून १४ अंश सेल्सिअसपर्यंंत चढला होता.
मात्र त्यानंतर ढगाळ वातावरणासह दिवसभर वाहणार्या गारा वार्यांमुळे पारा झपाट्याने खाली उतरला आहे. २७ डिसेंबरपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंंत खाली उतरला असून, आजपर्यंंत कायम आहे.
काही भागात दिवसाच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. सर्वत्र थंड वारे वाहत आहेत. रात्रीच्या वेळी शहरी भागासह ग्रामीण नागरिकांनाही हुडहुडी भरली आहे. पुढील दोन दिवस जिल्हाभरात थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती आहे.