तूर खरेदी करण्यासाठी ठिय्या!

By admin | Published: June 15, 2017 12:19 AM2017-06-15T00:19:06+5:302017-06-15T00:19:06+5:30

शिव सैनिकांनी कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

Thure to buy tur! | तूर खरेदी करण्यासाठी ठिय्या!

तूर खरेदी करण्यासाठी ठिय्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : तूर विक्रीकरिता नोंदणी करुन टोकन प्राप्त केलेल्या त्या १६२४ तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी पूर्ववत सुरु न करण्यात आल्याने या संदर्भात जाब विचारण्याकरिता शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह १४ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर धडक देत मुख्य प्रशासकांच्या कॅबीनमध्ये ठिय्या करीत जाब विचारुन उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विक्री करिता सद्यस्थितीत २२६० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यांना बाजार समितीने टोकन सुध्दा दिले. त्यापैकी जवळपास ६३६ शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप बाजार समितीकडून केल्या गेले. मात्र उर्वरित १६२४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याबाबत साशंकता कायम असल्याने याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी १० जून रोजी बाजार समिती प्रशासनाला रितसर निवेदन देत तूरखरेदी प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापपावेतो या मागणीवर निर्णय न झाल्याने १४ जून रोजी दुपारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाजार समिती कार्यालयावर धडक दिली.
यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक साहेबराव पाटील व सचिव राधेश्याम शर्मा हे कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक यांचे कॅबीनमध्ये ठिय्या दिला. तसेच उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना तूर खरेदी संदर्भात जाब विचारला.
यावेळी तालुका उपप्रमुख अनंता गायगोळ, गजानन धाडे, सुरेश अहीर, श्रावण पाटील, समाधान साठे, संदेश शिंदे, स्वप्नील तडेकर, सचिन चव्हाण, अक्षय जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

कृषी अधिकाऱ्यांना घातला घेराव
तालुक्यातील जलयुक्त शिवारांच्या निकृष्ट कामांची तत्काळ चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी कृषी अधिकारी बुधवत यांना घेराव घालून धारेवर धरले. मलकापूर तालुक्यात जलयुक्त शिवारांची कामे अतिशय संथगतीने सुरु असून, त्यातही होणारे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर वले व उप तालुकाप्रमुख राजेशसिंह राजपूत यांच्याकडे बोलून दाखविली. निकृष्ट कामांमुळे त्याठिकाणी पाणीच साचत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही फायदा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. दरम्यान या बाबीची तत्काळ दखल घेत १४ जून रोजी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, तालुका उपप्रमुख राजेशसिंह राजपूत व शिवसैनिकांनी कृषी कार्यालय गाठत उपस्थित कृषी अधिकारी बुधवत यांना या विषयावर धारेवर धरत जाब विचारला. दरम्यान, कृषी अधिकारी बुधवत यांनी आम्ही सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करु, ती कामे चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगत निकृष्ट झालेल्या कामाची तत्काळ चौकशी करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, उप तालुकाप्रमुख राजेशसिंह राजपूत, माजी तालुकाप्रमुख एकनाथ डवले, कृउबास प्रशासक उमेश राऊत, शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर, युवा सेना जिल्हा उपप्रमुख अमोल टप, नगरसेवक राजेश फुलोरकार, युवा सेना शहर उपप्रमुख योगेश ढगे, संदीप पाटील, मयूर मंडवाले, सचिन रुले, संदीप भंसाली, महादेव पवार आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Web Title: Thure to buy tur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.