‘व्याघ्र संवर्धन’ : ज्ञानगंगात ८० ट्रॅप कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 02:08 PM2020-03-02T14:08:36+5:302020-03-02T14:08:41+5:30
प्रती दोन चौरस किमीमध्ये एक या प्रमाणे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येऊन अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची गगन करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्याचा ‘व्याघ्र संवर्धन’च्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीने काम सुरू केले असून दोन मार्च रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात प्रती दोन चौरस किमीमध्ये एक या प्रमाणे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येऊन अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची गगन करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
दरम्यान, यासंदर्भानेत वन्यजीव विभागाच्या कर्मचारी, वनमजुरांचे व तज्ज्ञांचे बोथा येथील नक्षत्र बनामध्ये सकाळी एक छोटेखानी पशिक्षणही घेण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाच्या सुत्रांनी दिली. ज्ञानगंगा अभयारण्यात यवतमाळ जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यातून आलेल्या टी-वन सी-वन वाघाने गेल्या दोन महिन्यापासून आपले बस्तान बसवले आहे.
त्या पार्श्वभूमीवर व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्याचा अभ्यास करण्यासाठी वन्यजीव विभागाचे अपर प्रधान सचिव तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी एम. ए. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी या समितीला त्यांचा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पाठवावयाचा आहे. त्यादृ्ष्टीने समितीने काम सुरू केले आहे.