वडिलांच्या तेरवीत अनिष्ट प्रथांना तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:25+5:302021-04-06T04:33:25+5:30

परंपरेनुसार कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे दु:खद निधन झाले की, तेरवीच्या दिवशी मंदिरावर नातेसंबंधातील व्याही, सासरे, ...

Tilangali to the undesirable practices of the father's thirteenth | वडिलांच्या तेरवीत अनिष्ट प्रथांना तिलांजली

वडिलांच्या तेरवीत अनिष्ट प्रथांना तिलांजली

googlenewsNext

परंपरेनुसार कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे दु:खद निधन झाले की,

तेरवीच्या दिवशी मंदिरावर नातेसंबंधातील व्याही, सासरे, मेहुणा यांच्याकडून सुतकी नातेवाइकांसाठी शेले-टावेल टोपी तसेच नवीन कपडे याचा आहेर दिला जात असे. या प्रथेमुळे संबंधित नातेवाइकांवर अधिकचा आर्थिक भार पडत असे. नातेवाइकांना अशा प्रकारचा आहेर घेत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असे. यासाठी अधिकचा पैसा खर्च होऊन त्यासाठी नातेवाईक मंडळी उसनवार वा कधी-कधी व्याजाने पैसे घेऊन सदर सोपस्कार पार पाडत होते. पारावर मिळालेले शेले, टोपी, टॉवेल वा नवीन कपडे पुनश्च कुठेही वापरले जात नसल्याची रुढी परंपरा होती. एवढ्याच कालावधी पुरते ते वापरायचे असल्याने यावर नातेवाईक मंडळींचा भरमसाठ खर्च होत होता. या अनिष्ट रुढी परंपरा भावकीतील तरुणांनाही नकोशा होत्याच.

चौकट...

निर्णयाचे तरुणाईकडून स्वागत

या तेरवी कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील या खर्चिक अनिष्ट रुढी परंपरेला छेद देत असल्याबाबत समाजबांधवांनी जाहीर केले. या कार्यक्रमास शेतकरी नेते माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर उपस्थित होते .

समाजबांधवांनी घेतलेला हा निर्णय स्वतः रविकांत तुपकर यांनी पारावर सर्वांसमक्ष विशद करावा, अशी विनंती त्यांना केली असता या क्रांतिकारी निर्णयाचे त्यांनीही स्वागत केले.

सातव-पाटील परिवार वरील प्रथा परंपरेला तिलांजली देत असल्याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Tilangali to the undesirable practices of the father's thirteenth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.