वेळ, शिस्त आणि कर्तव्याचे पालन गरजेचे : कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:31+5:302021-04-05T04:30:31+5:30
कोरोना पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये ३ एप्रिल रोजी शिक्षक सहविचार सभेचे ...
कोरोना पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये ३ एप्रिल रोजी शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. सहविचार सभेच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षक डी. आर.पाटील यांनी शालेय पोषण आहार वाटपासंदर्भात तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षकांचे आरोग्य व विद्यार्थ्यांचा अभ्यास तथा स्वाध्याय उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर.बी.कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंदाने अध्यापन करण्याचे आवाहन शिक्षकांना केले. काही अडचण असल्यास पूर्वसूचना देण्याचे सूचित केले. या प्रसंगी कोविड १९ सारख्या महाभयंकर संकटातही सर्व शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापनाचे कार्य उत्कृष्टरित्या सुरू असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. सहविचार सभेस प्रामुख्याने पर्यवेक्षक डी.व्ही.जाधव, पर्यवेक्षक डी. ए. खांडेभराड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रेमचंद राठोड यांनी मानले.