वेळ निघून जात आहे, क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:24+5:302021-03-24T04:32:24+5:30

संसर्गजन्य रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश होतो. क्षयरोग उच्चाटनासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तालुक्‍याला १ असे १३ पथक ...

Time is running out, to achieve the goal of eradicating tuberculosis | वेळ निघून जात आहे, क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची

वेळ निघून जात आहे, क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची

Next

संसर्गजन्य रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश होतो. क्षयरोग उच्चाटनासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तालुक्‍याला १ असे १३ पथक आहेत व जिल्ह्यामध्ये एकूण २६ डी.एम.सी. मान्यताप्राप्त सूक्ष्मतादर्शक केंद्रे आहेत. तेथे थुंकी नमुन्याची तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करण्यात येते. प्रत्येक क्षयरोग पथकाला एक वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक कार्यरत आहेत. व ५ ते ६ डी.एम.सी. साठी एक वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सहा शहरी भागासाठी सहा टह.बी.एच.व्ही. कार्यरत आहेत. बुलडाणा येथे एक जिल्हा क्षयरोग केंद्र असून तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, डी.पी.सी., डी.पी.एस, पी.पी. एम., डी.ई.ओ. लेखापाल, इत्यादी स्टाफ आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून १३० व खासगी डॉक्टरांकडून १२० असे एकूण अंदाजे २५० नवीन टीबीचे रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात. दरवर्षी अंदाजे एकुण २७०० ते २९०० टीबीचे रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात.

सीबीनॅट मशीन

जिल्ह्यामध्ये मार्च २०१६ पासून क्षयरोगाचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक मशिन उपलब्ध आहे. यामशिनद्वारे क्षयरोग रुग्णांचे निदान सुध्दा करता येते. थुंकीनुमने तसेच इतर

अवयवांच्या टीबीचीसुध्दा तपासणी करता येते. केवळ २ तासामध्ये निदान होते. जिल्ह्यात शासकीय तसेच खासगी डॉक्टर व प्रयोगशाळा येथील संशयित टीबी रुग्णांची तपासणी मोफत करण्यात येते.

क्षयरुग्ण शोधून शासकीय यंत्रणेला कळवल्यास प्रत्येक क्षयरुग्णामागे १००० रुपये डॉक्टरांना मिळतात. ५०० रुपये प्रति महिना सर्व क्षयरुग्णांसाठी पोषक आहारासाठी दिले जातात. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमीत्ताने वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २०२५ पर्यंत क्षयरोग नष्ट करण्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. मिलिंद जाधव,

जिल्हा क्षयरोग अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Time is running out, to achieve the goal of eradicating tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.