कडक निर्बंधामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:41+5:302021-05-26T04:34:41+5:30
राज्यात सर्वत्र काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे़ गेल्या ...
राज्यात सर्वत्र काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून विविध गावी जाऊन दगडाचे खलबत्ता, नंदी, महादेव, जातं, पाटा-वरवंटा, उखळ स्वतःच्या कलाकुसरीने तयार करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ अमोल कडू मिरकर या कारागिराने सांगितले की आम्ही बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील रहिवासी असून आमचा पिढीजात व्यवसाय दगडाच्या विविध घरगुती वस्तू तयार करून राज्यभर विक्री करीत असतो़ गेल्या दोन महिन्यांपासून मेहकरला आलो असता कोरोनाच्या महमारीमुळे आमचा पूर्णपणे व्यवसाय बंद झालेला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू असल्याने कोणीही बहार निघत नसल्याने १०० रुपये येणेही कठीण झाले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही या परिवाराने केली आहे.