बॅण्ड पथकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:09+5:302021-04-29T04:26:09+5:30

लाॅकडाऊनमुळे व्यावसायिकांचे नुकसान धामणगाव धाडः परिसरात यात्रा, उत्सव व लग्नसराईत नवरदेवाच्या वरातीत मिरवण्यासाठी लागणारा घोडा देणारे व्यावसायिक संकटात ...

A time of starvation on the band members | बॅण्ड पथकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ

बॅण्ड पथकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ

googlenewsNext

लाॅकडाऊनमुळे व्यावसायिकांचे नुकसान

धामणगाव धाडः परिसरात यात्रा, उत्सव व लग्नसराईत नवरदेवाच्या वरातीत मिरवण्यासाठी लागणारा घोडा देणारे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मार्च, एप्रिल, मे, जून आदी चार महिने लग्नसराईचा हंगाम असतो. मात्र, मागील वर्षी त्यांचा व्यवसाय गेला. यंदाही कोरोनामुळे त्यांचे नुकसान होत आहे. केवळ घोडे व्यावसायिकांचे नव्हे तर लग्न कार्याशी संबंधित बहुतांश छोटेखानी व्यवसायांना याचा फटका बसला आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा अभाव

देऊळगाव मही : येथील नागरिक मास्क न बांधता फिरताना दिसून येत आहेत. बाजारपेठेत इतरही कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

मेहकर : ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अपघात हाेत असल्याचे चित्र आहे.

व्हायरल फिव्हरची साथ, ग्रामस्थ त्रस्त

जानेफळ : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, ताप, खाेकल्याचे त्रास हाेत आहे. काेराेनाची हिच लक्षणे असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतल्याचे चित्र जानेफळ परिसरातील अनेक गावांमध्ये आहे.

वीज पुरवठा खंडित ; शेतकरी त्रस्त

देऊळगाव माळी : तालुक्यातील शेतकरी उन्हाळी हंगामाची तयारी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

कांदा काढणीच्या मजुरीत वाढ

मोताळा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकांची लागवड केली आहे. सुरुवातील लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काढणीचे दर वाढले आहे.

कचऱ्याची कोंडी सुटेना

मोताळा : बसस्थानकासमोर गत काही महिन्यांपासून कचऱ्याचे साम्राज्य आहे. कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कोरोना काळात स्वच्छता ठेवण्याची मागणी शे. बिलाल यांनी नगरपंचायतीकडे केली आहे.

चिंचखेडनाथ येथे पाणीटंचाई

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील चिंचखेडनाथ सोबतच जिल्ह्यातील चार गावांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे चिंचखेडनाथ येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

बोराखेडी येथे कोरोना लसीकरण जनजागृती

मोताळा : आदर्श जि. प. शाळा बोराखेडीच्या वतीने कोरोना लसीकरणाची जनजागृती करण्यात आली. तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी व प्राथमिक आरोग्य अधिकारी यांच्या वतीने प्रत्येक गावात शिक्षकांनी घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

रमजान महिन्यात भारनियमन बंद करा

देऊळगाव राजा : तालुक्यातील किन्ही राजा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरुन वर्षातील बाराही महिने भारनियमन केले जात आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात तरी भारनियमन बंद करावे, अशी मागणी येथील मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे.

लसीकरण वाढवा !

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संक्रमणाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक असलेल्या शहरांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी विनोद सोनोने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: A time of starvation on the band members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.