कलिंगड रस्त्यावर टाकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:16+5:302021-05-30T04:27:16+5:30

साखरखेर्डा परिसरातील शिंदी, सवडद, तांदूळवाडी, आंबेवाडी या चार गावांत बागायतदार शेतकरी जास्त आहेत. यापैकी अनेकांनी शेतातच घर करून राहणे ...

Time to throw Kalingad on the road | कलिंगड रस्त्यावर टाकण्याची वेळ

कलिंगड रस्त्यावर टाकण्याची वेळ

Next

साखरखेर्डा परिसरातील शिंदी, सवडद, तांदूळवाडी, आंबेवाडी या चार गावांत बागायतदार शेतकरी जास्त आहेत. यापैकी अनेकांनी शेतातच घर करून राहणे पसंत केले आहे. बागायती शेती कसायची असेल, तर सकाळीच फवारणी, पाणी देणे, शेतीची मशागत ही कामे करावी लागतात. मजूर कामावर असले, तरी सर्व कामे त्यांच्यावर अवलंबून करायची म्हटलं तर नियमित होत नाही. स्वतः शेतकऱ्याला मेहनत घ्यावी लागते. शिंदी येथील विनोद खरात हे बागायती शेती करतात. आजही पारंपरिक पीक घेण्यापेक्षा त्यांनी कलिंगड, खरबूज, डाळिंब, पेरू, आंबा या फळबागा लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. डाळिंबाची फुले गळून पडली. कलिंगडाची लागवड यशस्वी झाली असताना व्यापाऱ्यांनी मालाची उचल केली नाही. गेल्या चार महिन्यांपासून बाजार बंद असल्याने नेमके कलिंगड न्यावे कोठे? हा प्रश्न पडला आहे. काढलेले कलिंगड व्यापाऱ्यांनी नेले नसल्याने विनोद खरात यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नेता येईल एवढे कलिंगड वाटण्याचा निर्णय घेतला. कारण फळ खराब होते, त्याची दुर्गंधी पसरते. यापेक्षा फुकट वाटलेले बरे ! असा निर्णय त्यांनी घेतला.

--पाच लाखांचा तोटा--

शेतकऱ्यांना यंदा मोठा तोटा सहन करावा लागला. कलिंगड विक्री न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड रस्त्यावर फेकून दिले, तर काहींनी वाटप केले. यावर्षी शेतकरी विनोद खरात यांना पाच लाखांचा तोटा सहन करावा लागला. हीच अवस्था तांदूळवाडी, सवडद, आंबेवाडी येथील शेतकऱ्यांची आहे.

Web Title: Time to throw Kalingad on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.