धान्य गोदामावरील टिनपत्रे उडाली
By admin | Published: April 16, 2015 12:41 AM2015-04-16T00:41:00+5:302015-04-16T00:41:00+5:30
खामगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका; गोदामातील धान्य हलविले.
खामगाव (जि. बुलडाणा): : शनिवार व रविवार या दिवशी वादळी वार्यासह अवकाळी पाऊस होवून मोठय़ा प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. तर या वादळी वार्यामुळे तालुक्यातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. तसेच खामगाव-अकोला रोडवरील शेलोडी शिवार असलेल्या धान्य गोदाम वादळी वार्याचा फटका बसला आहे. खामगाव-अकोला रोडवरील शेलोडी शिवारात ब्लक स्टोन कंपनीचे धान्य गोदाम असून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या नियंत्रणाखाली कामकाज आहे. या परिसरात जवळपास ३५ हजार मेट्रीक टन क्षमता धान्य असणारे ७ मोठे गोदाम आहेत. येथे शासनाच्या योजनेतील १३ ही तालुक्यात येथूनच धान्य वितरीत केले जाते. ११ एप्रिल रोजी ४ ते ५ वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस झाला. या वादळी वार्याने एका गोडावून वरील टिनपत्रे कैचीसह उडून गेली. सुदैवाने धान्यावर ताडपत्री ठेवलेली असल्याने धान्य भिजण्यापासून वाचविण्यात यश आले. अवकाळी पावसामुळे धान्य भिजू नये म्हणून गावामधील गहू व तांदळाचे धान्य दुसर्या गोदामामध्ये सुरक्षीत हलविण्याचे काम सुरु होते.दुपारी उशिरापर्यंंत सर्व धान्य इतरत्र हलविण्यात आले.