टिप्परला कारची धडक; चार जखमी

By admin | Published: May 13, 2017 04:50 AM2017-05-13T04:50:54+5:302017-05-13T04:50:54+5:30

सिंदखेडराजावरून जालन्याकडे जाणा-या टिप्परने मोती तलाव वळणावर समोरासमोर धडक दिल्यामुळे कारमधील चार व्यक्ती गंभीर जखमी

Tipper hit the car; Four injured | टिप्परला कारची धडक; चार जखमी

टिप्परला कारची धडक; चार जखमी

Next

सिंदखेडराजा : जालन्याकडून येणाऱ्या कारला सिंदखेडराजावरून जालन्याकडे जाणाऱ्या टिप्परने मोती तलाव वळणावर समोरासमोर धडक दिल्यामुळे कारमधील चार व्यक्ती गंभीर जखमी झाले असून, कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
टिप्पर चालक रफिक पठाण याच्यावर अपराध नं.७१/२०१७ कलम २७९, ३३७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, सदर चौकशी सहायक ठाणेदार संतोष नेमणार करीत आहेत.
जालनावरून सिंदखेडराजाकडे येत असलेली कार क्रमांक एम.एच.२० बी.एन.५०२ ला सिंदखेडराजावरून जालनाकडे जाणारे टिप्पर क्र.एम.एच.०४ सी.जी.९० ने कारला मोती तलाव वळणावर १२ मे रोजी सकाळी १० वाजता जबर धडक दिल्यामुळे कारचे चालक सागर अशोक मुंदडा २५, बहीण राधिका बजाज, आरती बजाज व शहा हे जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी
खामगाव : समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले. ही घटना १२ मे रोजी रोजी खामगाव-शेगाव रस्त्यावर वरखेड फाट्यानजीक घडली. प्रल्हाद तुकाराम हागे (वय ३९) व वर्षा प्रल्हाद हागे हे दुचाकी क्रमांक एम.एच.२८ एएम८०६२ ने खामगावकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. यामध्ये प्रल्हाद हागे व वर्षा हागे हे जखमी झाले.

Web Title: Tipper hit the car; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.