टिटवी तलाव ठरताेय पर्यटकांसाठी आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:36+5:302021-09-02T05:14:36+5:30
टिटवी तलाव हे कौटुंबिक पर्यटन केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार ...
टिटवी तलाव हे कौटुंबिक पर्यटन केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार यांनी टिटवी तलावास भेट दिली असता व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य गोदावरी भगवानराव कोकाटे, आदिवासी मत्स्य व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष सरपंच भगवानराव कोकाटे आणि सदस्य उपस्थित होते. टिटवी येथील तलावातील धबधबा हा ऑगस्ट महिन्यात मागील तीन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्यामुळे वाहत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी विदर्भ-मराठवाड्यातून नागरिक येत असतात. तलावाजवळचा परिसर हा घनदाट वृक्षाने बहरलेला आहे.
पर्यटन केंद्र झाल्यास मिळेल रोजगार
लोणार शहरापासून दूर असल्यामुळे महिला आणि बच्चे कंपनीस हा धबधबा व परिसर चांगलाच आकर्षण केंद्र ठरत आहे. शासनाने टिटवी तलावास पर्यटनाचा दर्जा द्यावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. पर्यटन केंद्र झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.