बुलडाण्यात आज दारूमुक्ती निर्धार परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:14 AM2017-09-15T00:14:08+5:302017-09-15T00:14:14+5:30
जिल्ह्यात दारूच्या व्यसनाने अनेक परिवार त्रस्त झाले आहेत, तर अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत. या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात एक लोकचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून होत आहे. त्यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्यावतीने व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या प्रमुख आयोजनात ‘दारूमुक्ती निर्धार परिषदेचे’ आयोजन १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात दारूच्या व्यसनाने अनेक परिवार त्रस्त झाले आहेत, तर अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत. या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात एक लोकचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून होत आहे. त्यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्यावतीने व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या प्रमुख आयोजनात ‘दारूमुक्ती निर्धार परिषदेचे’ आयोजन १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात आले आहे.
या परिषदेला दारूबंदी चळवळीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वावी यांचे मार्गदर्शन सोबतच सप्तखंजिरीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधनाचे काम करणारे ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन होणार आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरीती, रुढी, परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्याचे महान कार्य करणारे अविनाश पाटील हे ‘दारूमुक्तीसाठी आम्ही लढतो आहोत’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गावस्तरावर सुरू असलेल्या या एकाकी लढय़ाला, जिल्हाभर व्यापक करून संपूर्ण शक्तिनिशी या व्यसनरूपी राक्षसावर प्रहार करणारी एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून ‘पहिलं पाउल’ म्हणून ‘दारूमुक्ती निर्धार परिषद’ आयोजन बुलडाणा येथे गर्दे हॉलमध्ये हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. या दारूमुक्ती निर्धार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.